HomeUncategorizedमराठा मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी लाठीचार्जचा आदेश...

मराठा मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करावे,- आ. संग्राम जगताप

advertisement

अहमदनगर दि.२ सप्टेंबर

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटा या गावामध्ये मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू होते मात्र या आंदोलकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केल्यामुळे या आंदोलनाला आता वेगळे वळण लागले असून महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी या लाठीचार्ज नंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू आहे या लाठी चार्जचा निषेध करण्यासाठी आज अहमदनगर शहरातून सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की ज्या अधिकाऱ्यांनी हा लाठी चार्जचा आदेश दिला त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि या लाठीचार्ज प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आमदार संग्राम जगताप यांनी केली

यावेळी सकल मराठा समाजाचे जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत गाडे, उपमहापौर गणेश भोसले, अविनाश घुले, प्रा. माणिक विधाते, संपत बारस्कर, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, अभिजित खोसे, निखिल वारे, खासेराव शितोळे, बापूसाहेब कांडेकर, मंत्री पांडूळे, अरविंद शिंदे, कुमारसिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, विठ्ठल गुंजाळ, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, योगेश ठुबे, अजित कोतकर, मंगेश खताळ, शिवाजी डोके, बाळासाहेब बारस्कर, सतीश बारस्कर, तुकाराम तावरे, रामकृष्ण कर्डिले, महेश दळवी, बापू राजेभोसले आदी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular