Homeशहरमराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करिता आमरण उपोषणाला बसलेल्या...

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करिता आमरण उपोषणाला बसलेल्या गोरख दळवी,संतोष आजबे,नवनाथ काळे,अमोल हुंबे यांची प्रकृती खालवली

advertisement

अहमदनगर दि.२ ऑक्टोबर

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणि अंतरवाली सराटा येथे आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून गेल्या चार दिवसांपासून अहमदनगर शहरातील तहसील कार्यालया समोर सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आमरण उपोषणांमध्ये गोरख दळवी,संतोष आजबे,नवनाथ काळे,अमोल हुंबे हे चार मराठा कार्यकर्त्यांनी अन्न व जल त्याग केला आहे. दोन दिवसांपूर्वी या उपोषणकर्त्याना तपासण्यासाठी शासकीय डॉक्टर पथक उपोषण स्थळी आले होते मात्र उपोषणकर्त्यांनी उपचार नाकारल्याने हे पथक निघून गेले मात्र आता चौथ्या दिवशी या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवली असून त्यांची शुगर लेवल कमी झाल्याने अखेर मराठा समाजातील काही डॉक्टरांनी या चार तरुणांवर उपचार सुरू केले आहेत. या उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून सध्या तात्पुरते या चार उपोषण करताना सलाईन लावण्यात आले आहे. जर आणखीन दोन दिवस हे आमरण उपोषण सुरू राहिल्यास या उपोषणकर्त्यांची परिस्थिती गंभीर होऊ शकते असेही उपचार करणारे डॉ.अविनाश मोरे, डॉ.सचिन पांडुळे, डॉ .विजय कावळे ,डॉ.सुनील बोठे डॉक्टरांनी यावेळी सांगितले

सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणताही तोडगा काढला नसल्याने आता हे आंदोलन नेमके कुठे थांबणार अशी चर्चा सुरू असून जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषणावर आम्ही ठाम राहणार असल्याचे आमरण उपोषणाला बसलेले गोरख दळवी,संतोष आजबे,नवनाथ काळे,अमोल हुंबे यांनी सांगितलय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular