अहमदनगर दि. 2 ऑक्टोबर
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आंदोलन आणि उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि गावामध्ये मराठा समाज बांधवांनी आंदोलन आणि उपोषण चालू केले आहे तर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटा येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून अहमदनगर शहरातील पारिजातक चौकात मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
नितीन भाकरे,आकाश सोनवणे, शिरीष जानवे, बाळासाहेब सोनवणे, एडवोकेट लक्ष्मीकांत पठारे, केतन ठाणगे, निखिल गव्हाणे, अमोल घोरपडे ,अजित, किशोर वाकळे, निळकंठ सोले, केतन ढवण ,राजेंद्र दाणे बाळासाहेब कव्हणे, आधी मराठा समाज बांधवांनी बुधवारी रात्रीपासून उपोषण सुरू केले असून हे साखळी उपोषण जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सुरूच राहील असा इशारा या मराठा बांधवांनी दिला आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे यासाठी सरकारने आता तातडीने काहीतरी निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक मराठा समाज बांधवांनी एक दिवस समाजासाठी म्हणून या साखळी उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.