अहमदनगर दि.१९ ऑक्टोबर
शारदीय नवरात्र उत्सवाची सध्या सर्वत्र धूम धाम सुरू असून विविध देवी मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी या गडावर मोठा देवी मंदिराच्या कळसावर आज अहमदनगर दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील यांनी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली.
मोहटा देवी गडावर हेलिकॉप्टर मधून खासदार सुजय विखे पाटील पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मोहटा देवीचे दर्शन घेऊन खासदार सुजय विखे पाटील आणि मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली.
यावर्षी नवरात्रीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम केला पाहिजे हे ठरवले होते याआधीही अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले आहेत की जे या आधी कधीही राबवले गेले नव्हते मोहटादेवी बद्दल आमच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे आणि त्यामुळे नवरात्रीच्या या उत्सव काळात एखादी नवीन संकल्पना राबवावी असे ठरले होते त्यामुळे आमदार मोनिकाताई राजळे आणि आम्ही मिळून मंदिराच्या कळसावर पुष्पवृष्टी करून देवीची आराधना करण्याचं काम केलं असल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी यांनी सांगितलय तसेच संपूर्ण जिराईत भागातील शेतकरी सुखावला गेला पाहिजे पाऊस आणि अतिवृष्टी या सर्व संकटातून समाजाला दूर ठेवणे आणि त्याचबरोबर 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होऊ घातलेला आहे तो निर्विघ्नपणे पार पडो आणि आमचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होवोत असं साकडं देवीला घातले असल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर सांगितलं