अहमदनगर दि.३० ऑक्टोबर
अहमदनगर महानगरपालिकेचे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मदन आढाव यांनी आज आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करता मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत मात्र सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे अशा सरकार बरोबर राहून आपला पदाचा उपयोग नसल्याने या पदाचा राजीनामा आपण देऊन पक्षाचा राजीनामाही पक्षप्रमुखांकडे दिला असल्याचं नगरसेवक मदन आढाव यांनी सांगितलय.
दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेचे काही नगरसेवकांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला होता.मात्र पुढे काय असा प्रश्न उपस्थित होतोय.नुसता पाठिंबा देऊन नाही तर आरक्षणासाठी ठोस भूमिका घेण्याची गरज आता राजकीय नेत्यांनी घेण्याची गरज आहे.जशी मदन आढाव यांनी घेतली आहे.नगर शहरात मराठा समजातील अनेक राजकीय पदाधिकारी नगरसेवक विविध पदांवर विराजमान आहेत मात्र अशा लोकांनी राजकीय भूमिकेतून बाहेर येऊन समजासाठी काही तरी करणे गरजेचे आहे.