अहमदनगर दि.३० ऑक्टोबर
ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळावे या मागणी करता आता राज्यभर आंदोलन पेटले असून मराठा समाजाने ठिकठिकाणी मोर्चे आंदोलने आणि उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून बीड जिल्ह्यात आंदोलनाने चांगलाच पेट घेतला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार सोळंके यांच्या घरा समोरील चार चाकी वाहन जाळल्या नंतर माजलगाव नगरपरिषदेला आग लावण्यात आली होती. त्यानंतर आता बीड शहरामधील राष्ट्रवादी भवन मध्ये तोडफोड करून राष्ट्रवादी भवनला आग लावण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता सरकारला जोपर्यंत जाग येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच पेटत राहणारा असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे याला आता सरकारने लवकरात लवकर या आरक्षणावर तोडगा काढावा अशी मागणी समस्त मराठा समाजाच्या वतीने होत आहे.
हळूहळू महाराष्ट्र पेटू लागला असून सरकारला हे आंदोलन झेपणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसण्याच्या पहिल्याच दिवशी दिला होता त्याचा प्रत्यय आता दिसून येत असून हे आंदोलन आता चांगलेच पेटले आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा पुढील काळात संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल असेच काहीसे चित्र सध्या दिसून येतेय.