Home राजकारण मराठा आरक्षणासाठी नगरसेवक आक्रमक… आरक्षण द्या नाहीतर राजीनामा देणार… सकल मराठा समाज...

मराठा आरक्षणासाठी नगरसेवक आक्रमक… आरक्षण द्या नाहीतर राजीनामा देणार… सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या साखळी उपोषणास सर्वच नगरसेवकांचा पाठिंबा

अहमदनगर दि.२८ ऑक्टोबर

ओबीसी मधूनच मराठा आरक्षण मिळावे या मागणी करता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.यानंतर आता संपूर्ण राज्यातून ठिकठिकाणी मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवन्यासाठी साखळी उपोषण प्रत्येक गावात आणि शहरात सुरू आहे.

अहमदनगर शहरातील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू असून या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज अहमदनगर महानगरपालिकेतील अनेक मराठा समाजाचे नगरसेवक तसेच इतर समाजातील काही नगरसेवक उपस्थित होते प्रत्येकाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशीच मागणी केली असून मराठा समाजाच्या उपोषणाला सर्वच नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला आहे.

नगर शहराचे राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासंबंधी पाठिंबा दर्शवत मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव कसा आणता येईल आणि विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणावर चर्चा घडवून आणावी. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारला शिफारस करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नगर शहराचे नागरिक म्हणून आणि आमदार म्हणून या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

तर अनेक नगरसेवकांनी यावेळी आपला नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पदापेक्षा समाज मोठा या भूमिकेतून जर समाजाला न्याय मिळत नसेल तर आपण या पदावर न राहता राजीनामा देऊन टाकू अशी भूमिका नगरसेवकांनी यावेळी घेतली तसेच मराठा समाजाला लवकरात लवकर ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी नगरसेवकांनी केलीय .

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्यासह उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक मनोज कोतकर, अविनाश घुले, कुमार वाकळे, मदन आढाव, दीपाली बारस्कर, संपत बारस्कर, शाम नळकांडे, निखिल वारे, रवींद्र बारस्कर, विनीत पाऊलबुधे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर शीला शिंदे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, , अजय चितळे, अजय बारस्कर, अजिंक्य बोरकर, आमोल गाडे, सचिन शिंदे रवींद्र बारस्कर, आदी नगरसेवक आणि माजी नगरसेवकांनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दर्शवला.

एकीकडे राज्यांमध्ये िविध ठिकाणी राजकीय नेत्यांना आणि पुढार्‍यांना गावबंदी केली असल्याचे बोर्ड ठीक ठिकाणी लागले आहेत मात्र नगर शहरात वेगळे चित्र पाहायला मिळालं सर्वच राजकीय नेते आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून मराठा समाजासाठी एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळतेय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version