अहमदनगर दि.२८ ऑक्टोबर
ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार सध्या देशामध्ये रोजच घडत आहेत. मात्र अजूनही नागरिक शहाणे न होता या ऑनलाइनच्या फसव्या जाळ्यात अडकून लाखो करोडो रुपये गमवत आहेत. कमी श्रमात जास्त पैसा कमावणे हे आता प्रत्येकाचे स्वप्न असून ही गोष्ट हेरून सायबर हॅकर असो अथवा अनेक हुशार लोक अशा लोकांना हेरून पैसे लुबाडण्याचे काम करत असतात.
एक म्हण आहे झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये त्याचप्रमाणे सध्या दुनिया मध्ये अनेक लोक पैसे देण्यासाठी तयार असतात मात्र ते पैसे कसे घ्यायचे हे काही ठराविक लोकच अशा लोकांना गंडा घालून फरार होत असतात. अहमदनगर शहरातही असाच जवळपास अंदाजे दोनशे ते तीनशे कोटी रुपयांना गंडा
घातल्याची चर्चा सुरू आहे. मात्र फसवले गेलेले अनेक उच्चभूषित डॉक्टर ,वकील, पोलीस अधिकारी, मोठमोठे व्यवसायिक असल्यामुळे तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असाच काहीसा प्रकार या ठिकाणी झालेला आहे.
अहमदनगर शहरात काही दिवसांपूर्वी एक स्कीम घेऊन एक एजंट फिरत होता या स्कीम मध्ये एक लाख रुपये गुंतवले तर दर महिन्याला सात हजार रुपये त्या गुंतवणूकदाराला मिळत असे जोपर्यंत एक लाख रुपये भेटत नाही तोपर्यंत दर महिन्याला सात हजार रुपये देण्यात येत होते आणि त्यानंतर जन्मभर पाच हजार रुपये मिळणार अशीच काहीशी ही स्कीम होती ज्या प्रमाणात पैसे गुंतवले गेले त्या प्रमाणात जास्त पैसे मिळत असल्याची ही स्कीम होती यासाठी कायदेशीर कागदपत्र बाँड पेपरवर करारनामा होत असे. मात्र पैसे रोख स्वीकारले जात होते या स्कीमचे कोणतेही कार्यालय नव्हते तो एजंट घरी येऊन समक्षपणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करत असे विशेष म्हणजे एका भेटीत काम झाले नाही तर अनेक वेळा या भेटीगाठी होऊन पैसा कुठे व कसा गुंतला जाईल या आधी कोणी पैसा गुंतवला त्याच्याशी संपर्क करून कसा फायदा होतोय याची खात्रीशीर माहिती दिली जात असे काही कागदपत्रे दाखवून आपला पैसा कसा सुरक्षित राहील यासाठी विश्वास पटवून दिला जात असे आणि त्यानंतर मग व्यवहार झाल्यानंतर ठराविक महिने पैसे पोहोच केले जात होते मात्र गेल्या महिन्यापासून अनेकांना पैसे मिळाले नसल्याने त्या एजंटला फोन केला असता त्याचा फोनही स्विच ऑफ झालेला आहे आणि मग जेव्हा खात्री करण्यासाठी स्कीम मध्ये जे जे लोक सामील झाले होते त्यांना विचारले असता ही स्कीम फसवी असल्याचं समोर आले आहे.कारण पैसे घेऊन जाणारा आणि पैसे देणारा एजंटच फरार झाला असल्याची चर्चा सुरू असून तो एजंट होता का स्वतः मास्टरमाईंड होता हे अद्याप समोर आले नसले तरी अहमदनगर शहरातील अनेक उद्योगपती, पोलीस वकील,डॉक्टर यांना गंडा घालून जवळपास 200 ते 300 कोटी रुपये घेऊन हा एजंट अथवा मास्टरमाईंड फरार झालेला आहे अशी चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही याबाबत कुठेही तक्रार केलेली नसल्यामुळे याची वाच्यता झाली नाही मात्र ज्यांचे ज्यांचे पैसे यामध्ये गुंतवले गेले आहे ते नागरिक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. सुरुवात कोणी करायची याकडे आता लक्ष लागले असून कोण ना कोण याबाबत पुढे येणारच आहे हे निश्चित कारण अनेकांचे लाखो करोडो रुपये या स्कीम मध्ये गुंतलेले आहेत.