Homeशहरअहिल्यानगर एम.आय.डी.सी. परिसरात उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण.. हप्ताखोरांची दहशत...

अहिल्यानगर एम.आय.डी.सी. परिसरात उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण.. हप्ताखोरांची दहशत…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 31 मे

अहिल्यानगर एमआयडीसी परिसरामध्ये हप्ताखोरांच्या दहशतीमुळे पुन्हा एकदा उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी जानेवारी महिन्यात एमआयडीसी मधील विविध प्रश्‍न, गुन्हेगारी व अवैध धंदे बंद होण्यासाठी आमीच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली होती त्यावेळी या बैठकीत उद्योजकांनी एमआयडीसीत वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. तर अवैध धंदे चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी लावून धरली होती.

तर आता पुन्हा एमआयडीसी मधील काही तथाकथित समाजकारण्यांनी उद्योजकांकडे दमदाटी करत जबरदस्तीने हप्ता मागणे सुरू केले आहे जर हप्ता दिला नाही तर कंपनी बंद करू अशी धमकी ही राजरोसपणे हे समाजकंटक देत आहेत.

आज देखील काही समाजकंटकांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पैसे मागण्याचा सपाटा सुरू केला होता. जबरदस्तीने 25 हजार रुपयांचे तेल डबे एमआयडीसी परिसरातील उद्योजकांकडून घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत आता सोशल मीडियावर काही उद्योजकांनी पोस्ट टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अहिल्यानगर एम.आय.डी.सी. परिसरामध्ये उद्योग-धंद्यांचा वाढता विकास दिसून येत असताना, काही समाजकंटकांनी या परिसरात अडथळे निर्माण करण्याचा प्रकार समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे समाजकंटक काही उद्योजकांकडे “दमडाटी” म्हणजेच जबरदस्तीने हफ्ता मागण्याचे प्रकार करत असून, न दिल्यास कंपन्या बंद पाडण्याची धमकी देत आहेत.

आजदेखील, एका समाजसेवकाने जयंतीनिमित्त, कंपन्यांमध्ये जाऊन समाजकंटकांनी जबरदस्तीने पंचवीस हजार रुपये किंमतीच्या तेलाच्या डब्यांची मागणी केली. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, अशा कृतीमुळे फक्त संबंधित उद्योजकच नव्हे तर संपूर्ण एम.आय.डी.सी. परिसराची आणि अहिल्यानगर शहराची प्रतिमा मलीन होत आहे.

या विरोधात अनेक उद्योजकांनी एकत्र येत आहेत. तसेचं मा जिल्हाधीकारी साहेब, उद्योग मंत्री श्री उदयजी सामंत , पालकमंत्री श्री राधा कृष्णा विखे पाटील , जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक, यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

आपण सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. कोणीही उद्योजक अशा प्रकाराच्या डमडाटीचा बळी ठरत असेल, तर कृपया खालील संघटनांशी तात्काळ संपर्क साधावा:
• MCCI (Ahmednagar)
• महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअर्स असोसिएशन
• आमी औद्योगिक संघटना

आपला आवाज बुलंद करा, जेणेकरून उद्योजकतेचा विकास आणि परिसरातील शांतता अबाधित राहील आणि विकास घडत राहील.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular