Homeशहरकर्जतचे दबंग अधिकारी चंद्रशेखर यादव यांनी घेतला कोतवालीचा पदभार

कर्जतचे दबंग अधिकारी चंद्रशेखर यादव यांनी घेतला कोतवालीचा पदभार

advertisement

अहमदनगर दि.२ मार्च
अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील जवळपास 48 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अधिकाऱ्यांना बदल्यांची प्रतीक्षा होती. कोविड काळापासून थांबलेल्या बदल्या 2023 मध्ये झाल्या आहेत. अहमदनगर शहरातील महत्त्वाचे पोलीस ठाणे म्हणून समजल्या जाणाऱ्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये कर्जत मधून चंद्रशेखर यादव यांची बदली करण्यात आली आहे.

कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी आपला कार्यभार संभाळताना बऱ्यापैकी गुन्हेगारी आटोक्यात आणली होती. मात्र कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत अनेक ठिकाणं संवेदनशील असल्यामुळे आणि कोतवाली पोलीस स्टेशनची हद्द शहरासह नवीन उपनगर, केडगाव परिसर अशी मोठी हद्द असल्याने या परिसरात कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलिसांसमोर एक मोठे आवहानच असते आता हे आव्हान पेलण्यासाठी कर्जत येथून चंद्रशेखर यादव हे आले आहेत कर्जत मध्ये त्यांनी मोठमोठे संवेदनशील प्रकरण हाताळले असून कर्जत मधील शाळा महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थिनींसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत कर्जत मध्ये टवाळखोरांचे गुंडांची कंबर्डे मोडण्यात चंद्रशेखर यादव यांना यश आले होते. आता अहमदनगर शहरात चंद्रशेखर यादव यांच्या कामगिरीकडे लक्ष लागून असून कोतवाली पोलीस स्टेशन हे एक नेहमीच चर्चेचा विषय असते आगामी महापालिका निवडणूक आणि त्यादरम्यान होणारे सण उत्सव यामध्ये होणारे राजकिय शक्ती प्रदर्शन त्यामुळे आता चंद्रशेखर यादवांची आगामी काळात कसोटी लागणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular