अहिल्यानगर दिनांक 10 जानेवारी
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारानिमित्त जनतेने अपार प्रेम दिले आहे मात्र हे प्रेम मताच्या रूपाने परावर्तित करून आपल्या भागातील विकास कामांसह सामाजिक काम करण्यासाठी एक वेळ संधी द्यावी असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुमित संतोष वर्मा यांनी प्रभाग क्रमांक 11 च्या मतदारांना केले आहे.

प्रभाग क्रमांक 11 मधून ही लढाई बलाढ्य शक्तीविरुद्ध असतानाही मतदारांनी फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून आपल्याला पाठिंबा दिला आहे मात्र हा पाठिंबा मत रुपी उतरेल असा विश्वासही सुमित वर्मा यांनी व्यक्त करत नगर शहरात वाद-विवाद नको तर विकास व्हावा मी दिलेल्या प्रत्यक्ष शब्द आणि मी दिलेले प्रत्येक वचन निवडून आल्यानंतर नगरसेवक पदापर्यंत आणि नगरसेवक नसलो तरी कायमस्वरूपी पाळणारा व्यक्ती असल्याने आणि तरुणांना रोजगारासह बाजारपेठेतील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महानगरपालिकेत बाजारपेठेचा एक प्रतिनिधी पाठवावा असे आवाहनही सुमित संतोष वर्मा यांनी केले आहे.