अहिल्यानगर दिनांक 13 जानेवारी
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 11 (अ)मध्ये मनसेच्या सुमित वर्मा यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. विशेषतः सुविद्य, उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले सुमित वर्मा यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रभागात निम्मी लढाई आधीच जिंकली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रचारादरम्यान प्रभागातील गल्लीबोळातून, बैठका व मतदारांच्या गाठीभेटींमधून “यंदा बदल हवा” हा सूर सातत्याने उमटत असून, सुशिक्षित आणि विकासाभिमुख प्रतिनिधीची गरज नागरिक ठळकपणे व्यक्त करत आहेत. “आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर सुशिक्षित, उच्चविद्याविभूषीत आणि प्रामाणिक उमेदवाराची निवड आवश्यक आहे. त्या निकषांवर सुमित संतोष वर्मा हेच योग्य उमेदवार आहेत,” अशी भावना मतदारांमधून व्यक्त होत आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 11 (अ)मध्ये बदलाच्या अपेक्षेने मतदार सुशिक्षित नेतृत्वाकडे झुकत असल्याचे चित्र असून, येत्या मतदानात त्याचा थेट परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.