औरंगबाद दि.२५ सप्टेंबर
देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या पीएफआयच्या सदस्यांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते आज सकाळी शहरातील जिन्सी भागातील पीएफआय कार्यालयावर जाऊन धडकले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबादमध्ये मनसेने पीएफआयच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असल्याचं समोर आले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद येथील पीएफआयच्या कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले