Home क्राईम सावधान, मुलं चोरणारी टोळी बाबत सोशल मीडियावर  खोटे मेसेज फॉरवर्ड केले तर...

सावधान, मुलं चोरणारी टोळी बाबत सोशल मीडियावर  खोटे मेसेज फॉरवर्ड केले तर होऊ शकते कायदेशीर कारवाई – पोलीस अधीक्षक मनोज पाटील

अहमदनगर दि.२५ सप्टेंबर-
मुलं चोरणारी टोळी (Child kidnapping Gang) सक्रिय आहे, अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल झालेत. त्यामुळे पालक धास्तावलेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक या भागात मुलं चोरणाऱ्या टोळीबाबत अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. आता अशाच प्रकारच्या अफवा राज्यातील इतर शहरातही (ahmednager Crime News) पसरल्यात. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर पोलिसांनी एक पत्रक काढत लोकांना आवाहन केलंय. पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं अहमदनगर पोलिसांनी म्हटलंय. इतकंच नव्हे, तर असे मेसेज फॉरवर्ड करणारी लोकं आढळली, तर त्यांच्यावर कारवाईदेखील केली जाणार आहे.

दरम्यान, माहितीची शहानिशा न करता खोटी माहिती शेअर करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही अहमदनगर पोलिसांनी पत्रकातून दिला आहे. व्हॉट्सअप, फेसबुकसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मेसेज, व्हिडीओ, फोटोच्या माध्यमातून व्हायरल मेसेज पसरवण्यात आले होते.

असे काही आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष फोन नंबर0241 -2416132 अथवा 112 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version