अहमदनगर दि. १४ फेब्रुवारी
अहमदनगर महानगर पालिका क्षेत्रात पाणी महागण्याची शक्यता असून अहमदनगर महानगरपालिका प्रशासन पाणी पट्टी दरवाढ करण्याच्या तयारीत आहे तसेच अहमदनगर महानगर पालिकेच्या हद्दीत असणाऱ्या सर्वच व्यवसाययिक आस्थापनांना आता महानगर पालिकेच्या ठराविक रक्कम मनपा शुल्क म्हणून भरावी लागणार आहे त्याबाबतचा प्रस्ताव अहमदनगर महानगरपालिका प्रशासन सर्वसाधारण सभेपुढे ठेवणार आहे महानगरपालिकेच्या बजेटच्या सभेत हे दोन्ही विषय घेण्याची शक्यता असून याबाबत महानगरपालिकेच्या सभेत नगरसेवक काय भूमिका घेणार यावरच या प्रस्तावाचे भविष्य ठरणार आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत सध्या पंधराशे रुपये पाणी पट्टी दर आकारला जातो आता हा दर दुप्पट म्हणजे तीन हजार रुपये करण्यासाठी महानगरपालिका सर्वसाधारण सभे समोर प्रस्ताव ठेवणार असून अहमदनगर शहराची वाढती लोकसंख्या आणि पाणी पुरवठा करण्यासाठी येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने पाणीपट्टी वाढ करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला असल्याचं समजतंय तर अकोले महानगरपालिकेच्या धर्तीवर अहमदनगर शहरातही महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या सर्व व्यावसायिक अस्थापनांना शुल्क आकारण्याबाबतचा प्रस्तावही महानगरपालिकेसमोर ठेवण्यात येणार आहे अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून समजली आहे.
पुढील नऊ महिन्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक असून यावर्षीची बजेटची सभा या निवडणुकीसाठी चांगलीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांकडून या बजेटच्या सभेमध्ये काय निर्णय घेतले जातात आणि प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावा बाबत काय भूमिका घेतली जाते हे पाहणे चांगलेच असुक्याचे ठरणार आहे.कारण आता सर्वच नगरसेवकांना पुढील बजेटच्या आधी निवडणूकी करता सामोरे जावे लागणार असल्याने नगरसेवकांची भूमिका यावेळी महत्त्वाची ठरणार आहे.