Homeक्राईमचित्रपटाला शोभेल अशी घटना नगर शहरात घडली असून काही युवकांनी दुचाकीवरून घेऊन...

चित्रपटाला शोभेल अशी घटना नगर शहरात घडली असून काही युवकांनी दुचाकीवरून घेऊन एसटी बस थांबून त्यामध्ये बसलेल्या दोन मुलींना मारहाण करत नेले पळवून ..

advertisement

अहमदनगर दि.३० जुलै
अहमदनगर शहरात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली असून नगर शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडलेत का काय असाच प्रश्न आता समोर येतोय. अहमदनगर पुणे महामार्गावरील केडगाव परिसरातील हॉटेल निशा पॅलेस च्या पुढे एक एसटी बस थांबून त्या बसमधील दोन मुलींना मारहाण करत पळूवून नेल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे गुंडांना कोणाचीही भीती राहिली नसल्याचे समोर आले आहे पन्नास प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये चार तरुणांनी घुसून दोन मुलींना मारहाण करत त्यांच्या सोबत नेल्याच बस मधील प्रवाशांनी सांगितले आहे.

याबाबत बसमधील प्रवाशांनी सांगितलेली माहिती अशी की पुणे बस स्थानकावरून दोन मुली व एक मुलगा बस मध्ये बसले होते आणि बस जेव्हा पुणे स्टॅन्ड वरून पुण्याकडे रवाना झाली त्यावेळी नगर पुणे महामार्गावरील केडगाव परिसरातील निशा पॅलेस हॉटेलच्या पुढे गेल्यानंतर काही तरुण दुचाकीवरून येऊन त्यांनी बसला गाडी आडवी घालून बस अडवली आणि तीन युवकांनी बसमध्ये प्रवेश करून बसमध्ये बसलेल्या मुलींना मारहाण करत खाली उतरून घेऊन गेले यावेळी प्रवाशांनी त्यांना विरोध केला मात्र प्रवाशांना त्या तरुणांनी शिवीगाळ केली जे प्रवासी बस पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा असे सांगत होते त्या प्रवाशांना हा आमच्या घरातील मॅटर आहे तुम्ही मध्ये पडू नका असे जोरजोराने ओरडत तरुणांनी मुलींना ओढत घेऊन जाण्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र त्या मुली कोण होत्या आणि ते तरुण कोण होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. ही घटना घडल्यानंतर बस ड्रायव्हरने बस थोड्या अंतरावर निघून थांबवली होती.

मात्र या प्रकरणामुळे बस अनेक तास एकाच जागेवर उभी करण्यात आली होती त्यामुळे प्रवाशांचाही खोळंबा झाला मात्र अनेक प्रवाशांनी या घटनेचा संताप व्यक्त करत महाराष्ट्र मध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही का असा प्रश्न उपस्थित केलाय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular