अहमदनगर दि.२७ ऑगस्ट
नगर शहरातून व परिसरातून मोटर सायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. माळीवाडा परिसरातून आरोपीला अटक केली असून ९० हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. विनोद कडुबा सरकाळे असे अटक आरोपीचे नाव आहे.
नगर शहरात काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी एक पथक नेमून चोरीच्या मोटार सायकल शोध मोहीम सुरू केली होती या पथकाच्या हाती गेल्या ४ महिन्यात कोतवाली पोलीस ठाण्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातून चोरी गेलेल्या २७ मोटरसायकल हाती लगल्या असून
याच शोध मोहीम दरम्यान माळीवाडा परिसरात एक मोटरसायकल चोरी करणारा सराईत आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी त्याला सापळा लावून अटक केली आहे
.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचा मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस नाईक शाहिद शेख, रविंद्र टकले, प्रमोद लहारे, सुमित गवळी, दिपक रोहकले, नितीन शिंदे, राहूल गुंड यांनी केली आहे