HomeUncategorizedगोवंशीय जनावरांना सोडवण्यास गेलेल्या पोलीस पथकावर तडीपार गुंडाचा हल्ला अंगावर गाडी घालून...

गोवंशीय जनावरांना सोडवण्यास गेलेल्या पोलीस पथकावर तडीपार गुंडाचा हल्ला अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न..

advertisement

अहमदनगर दि.२७ ऑगस्ट
श्रीगोंदा मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करण्यास गेलेल्या पोलिसांवर चार चाकी गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असून याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दादाराव मस्के यांच्या फिर्यादी वरून चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये एक तडीपार गुंड ही सामील होता.

श्रीगोंदा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा शहरातील श्रीगोंदा कर्जत रस्त्यावर असणाऱ्या एका ठिकाणी काही गोवंशीय जनवारे डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती या माहितीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी खात्री करण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी असलेले अतीक गुलामहुसेन कुरेशी, नदीम महम्मद कुरेशी, ओंकार दशरथ सायकर, समद कादरजी कुरेशी, या आरोपींनी पोलिसांना पाहताच त्यांच्या अंगावर स्विफ्ट कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून आपला जीव वाचवला. या आरोपींमधील अतिक कुरेशी हा अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार असून तरीसुद्धा तो या परिसरात आढळून आला आणि त्याने पोलिसांच्या अंगावर गाडीही घातली होती.

याप्रकरणी आता श्रीगोंदा पोलीस ठाण्यातपोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दादाराव मस्के यांच्या फिर्यादी वरून चार आरोपींविरुद्ध भदवी कलम 307,353,332,427,504,506,34 सह महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 चे (सुधारणा 2015)चे कलम 5 (अ) (ब) चे उल्लंघन 9, सह प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (घ), सह म.पो.का.कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तडीपार गुंड अति कुरेशी हा फरार झाला आहे. पोलिसांनी या ठिकाणावरून जवळपास सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये गोवांशिय जनावरांसह वाहनांचा समावेश आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular