अहमदनगर दि.२९ जुलै
अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक आणि भाजपचे नेते ॲड.धनंजय जाधव नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतात समाजकार्याबरोबर ते साईबाबाचे निस्सीम भक्त ही आहेत. त्यामुळे त्यांनी आता एक नवीन संकल्पना आणली असून भक्ती आणि शक्ती याचा मिलाप करून एक वेगळा सामाजिक संदेश लोकांना देण्यासाठी आणि समाज जागृती करण्यासाठी “श्रद्धा सबुरी” या माध्यमातून छोट्या छोट्या दोन मिनिटांच्या शॉर्ट फिल्म तयार करून त्या सोशल मीडियाद्वारे पर्यंत पोहोचवणार असून या क्लिप मधून समाजाला एक वेगळा संदेश भेटणार आहे.
श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट निर्मित सामाजिक व आध्यात्मिक संदेश देणारा “ श्रद्धा सबुरी “ या शॉर्ट फिल्म चे लाँचिंग शनिवारी अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे भाजपचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी साईद्वारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.धनंजय जाधव, दिग्दर्शक अनंत जोशी, मितेश शहा, राहुल मुथा, विराज मुनोत, सारंग देशपांडे, प्रशांत जठार, महादेव गाडे आदी उपस्थित होते.
या छोट्या छोट्या क्लिपच्या माध्यमातून समाजामध्ये एक वेगळा संदेश पोहोचणार असून यामुळे समाजामध्ये एक वेगळी जागृती करण्याचं काम साई द्वारका सेवा ट्रस्ट करत असल्याचे प्रतिपादन यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी केल आहे. या छोट्या क्लिप पाहून खासदार सुजय विखे पाटील यांनी या प्रयोगाची संकल्पना साकारणारे ॲड.धनंजय जाधव यांच्यासह या शॉर्ट फिल्मचे निर्माते कलाकार आणि तंत्रज्ञान यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.