अहमदनगर दि.३१ जानेवारी
अहमदनगर शहरामध्ये मागील आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जिल्हा मेळावा झाला होता या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी अहमदनगर दक्षिणचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. खासदारांनी कामे न केल्यामुळे मता साठी साखर आणि डाळ वाटण्याची वेळ आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले होते.
या मेळाव्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नगर शहर जिल्हाउपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी खासदार संजय राऊत यांना खासदार विखे आणि कुटुंबियांनी नगर जिल्ह्यात वाटलेल्या साखर-डाळीपासून तयार केलेला प्रसादाचा लाडू खासदार राऊत यांना कुरिअर करून मुंबईच्या घराच्या पत्त्यावर पाठवले होते. खासदार सुजय विखे पाटील यांनी जी डाळ आणि साखर वाटली ती प्रभू श्रीरामाच्या भक्तीपोटी वाटली होती. आणि डाळ आणि साखर वाटल्यानंतर त्यांनी सर्व जिल्हा वासियांना आवाहन केले होते की या वस्तूंपासून प्रभू श्रीरामासाठी लाडू बनवा आणि ज्या दिवशी रामलल्लाची मूर्ती आयोध्या मध्ये सर्वांसाठी खुली केली जाणार त्या दिवशी प्रसाद म्हणून लाडू वाटावे असे आवाहनही केले होते. त्यानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून अनेक श्रीराम भक्तांनी लाडू बनवून प्रसाद म्हणून वाटले होते. मात्र राजकारण कुठे करावे आणि भक्ती कशी करावी हे खासदार संजय राऊत यांना समजत नसल्याने त्यांना हा प्रसाद पाठवून त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे अशी प्रार्थना त श्री प्रभू रामचंद्र यांच्या चरणी करतो असे सांगत धनंजय जाधव यांनी कुरिअरने लाडू पाठवले होते.
खासदार संजय राऊत यांच्यावर अहमदनगर शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस सह भाजपने सुद्धा टीका करून त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. मात्र अहमदनगर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही त्यामुळे शिवसेना फक्त नावापुरतीत उरली काय असा प्रश्न उपस्थित राहतोय. अहमदनगर मधील शहरातील प्रश्नांसाठी काही निवडक शिवसेना नेतेच सतत आवाज उठवत आहेत.विक्रम राठोड आणि उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात अनेक वेळा आवाज उठवला मात्र त्यांना साथ देण्यासाठी कोणीच पुढे आले नाही हेही विशेष. त्यामुळे अहमदनगर शिवसेनेचा बुलंद आवाज स्वर्गीय अनिल राठोड यांची उणीव आता शिवसेनेकांना भासत असून त्यांची जागा कोणी घेणारच नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय.