अहमदनगर दि.३१ जानेवारी
अहमदनगर शहरात तीन दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेची बुलंद म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले संजय राऊत यांनी अहमदनगर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दक्षिण जिल्ह्याचा मेळावा घेतला होता या मेळावात खासदार संजय राऊत यांनी दक्षिण जिल्ह्यातील राजकीय भाष्य कमी आणि अहमदनगर शहरातील ताबेमारी गुंडागर्दी यावरच भाषणाचा बराच वेळ दिला त्यामुळे हा मेळावा नेमका शहराचा होता की दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचा होता यावर संभ्रम निर्माण झाला होता. अहमदनगर शहरातील ताबा मारी या गंभीर विषयावर खासदार संजय राऊत यांनी चांगलाच हल्ला चढवला खरा पण आता हाच मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर उलटल्या सारखा दिसतोय. कारण खासदार संजय राऊत यांच्या मेळाव्यात अहमदनगर शहराच्या आमदारांवर ताबेमारीचा जो गंभीर आरोप झाला त्याला दुसऱ्या दिवशी आमदार गटाकडून प्रत्युत्तर देऊन नगरमध्ये जबरदस्तीने जागा बळकावल्याचे एक तरी प्रकरण साक्षी पुराव्यानिशी आमच्या समोर आणावे तुमच्या टांगेखालून जायला आम्हाला कमीपणा वाटणार नाही. परंतु तुमच्या रिकामटेकड्या बोल घेवड्या कार्यकर्त्यांनी खोटे नाटे सांगून तुमचे कान भरले आणि त्यांचे ऐकून तुम्ही कोणताही आगा पिछा खरे खोटे न बघता आमच्या नगर शहर विकासाच्या भाग्य विधाते युवा नेतृत्वावर टीका करीत असाल तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही असा इशारा प्रा.माणिक विधाते यांनी दिला होता.
मात्र यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या गोटाकडून दोन दिवस झाले तरी कोणतीच प्रतिक्रिया उमटली नाही त्यामुळे ताबेमारीचा मुद्दा शिवसेनेवरच उलटला असल्यास दिसून येतेय. थेट खासदार संजय राऊत यांच्यावर पत्रा चाळीवर ताबा मारून जेलची हवा खाऊन आलेल्या राऊतांनी आपल्या बुडाखालचा अंधार आधी झाकावा अशी टीका करण्यात आली तर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेताजी सुभाष चौकातील लोढा हाईट्सवर तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी अनेक वर्षांपासून ताबा मारलेला आहे. काही गाळ्यावर नगर अर्बन बँकेचे लोन आहे, जर तो शिवसेनेच्या नेत्याचा ताबा खाली केल्यास कित्येक गोर गरीब लोकांचे पैसे बँक देऊ शकेल त्यामूळे तुम्ही अशा ताबेमार शिवसेनेच्या नगर मधील नेत्यांचा पहिले ताबा खाली करा असे आव्हान देण्यात आले आहे.
खा.संजय राऊत यांनी स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांच्या बाबतही एक विधान केले होते अनिल राठोड हे सच्चे शिवसैनिक होते अन्याया विरुद्ध लढणारे खंबीर नेता होते सर्वसामन्यां नागरिकांच्या प्रश्नासाठी ते नेहमीच झगडत होते त्यांच्यासारखे काम तुम्हीही करावे असा सल्ला दिला होता म्हणजेच सध्या स्वर्गीय अनिल भैय्यांसारखा एकही शिवसेना नेता नगर शहरात नाही का असा प्रश्नही उपस्थित राहतोय.
खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात अहमदनगर शहरातील गुंडागिरी आणि ताबेमारी विरुद्ध आपण मोर्चा काढणार असल्याचे सांगितले होते त्याचबरोबर या गुंडागिरी आणि ताबे मारी विरुद्ध नागरिकांनी आपल्या तक्रारी शिवसेनेकडे देण्याचा आवाहन केले होते तसेच नेत्यांनी या तक्रारी आपल्याकडे पोहोचण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे असेही सांगितले होते. मात्र आता शिवसेनेच्याच नेत्यांविरुद्ध त्यांच्याच बालेकिल्लातील काही व्यापारी पोलिसांकडे तक्रार देणार असल्याचे माहिती समोर आली आहे. व्यापाऱ्यांना त्रास देऊन दुकान खाली करण्यासाठी धमकावणे तसेच गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून त्रास देणे अशा अनेक तक्रारी घेऊन व्यापारी पोलिसांकडे जाणार आहेत अशी माहिती आता समोर आली असून यामुळे शिवसेनेने ताबेमारी आणि गुंडागर्दीचा मुद्दा उचलला असला तरी तो त्यांच्यावरच पलटला असल्याचं सध्यातरी दिसून येत आहे. खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवर एवढा मोठा गंभीर आरोप होऊनही शिवसेनेच्या एकाही नेत्यांनी याबद्दल प्रतिक्रिया न देणे म्हणजेच ताबे मारीचा मुद्दा हा अंगलट आल्यासारखं दिसून येतेय.
या आधीही महाविकास आघाडी असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर याच विषयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. मात्र त्यावेळेसही कोणताही ठोस पुरावा जिल्हाधिकाऱ्यांना अथवा पोलिसांना दिला गेला नाही मात्र ताबे मारी विरुद्ध फक्त बोंबाबोंब होते प्रत्यक्षात कोणतीही तक्रार समोर येत नसल्याने शहरातील ताबेमारी नेमकी कोण करतेय हा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.