Home राजकारण महिलेला अश्लील शिविगाळ प्रकरण भोवणार? खासदार संजय राऊतांविरोधात अखेर गुन्हा दाखल

महिलेला अश्लील शिविगाळ प्रकरण भोवणार? खासदार संजय राऊतांविरोधात अखेर गुन्हा दाखल

मुंबई दि.३० जुलै :

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणात संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. ऑडिओ क्लिपच्या आधारे पोलिसांनी संजय राऊत आणि विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय कलम 507 अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेनं अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. याबाबत एक कथित ऑडिओ क्लिपही समोर आलीय. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत आणि या महिलेचं संभाषण असल्याचं सांगण्यात येत आहे. राऊत यांनी बलात्कार आणि हत्येची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेनं केलाय. याबाबत वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version