अहमदनगर दि.३० ऑक्टोबर
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सध्या मराठा आरक्षणाचे लोन पसरले असून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटा येथे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे आता सहाव्या दिवशी हे आंदोलन पेटले असून बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जाळपोळ सुरू झाली आहे. मराठा समाज आता संतप्त होऊन रस्त्यावर उतरू लागला असून सरकारने अजूनही मराठा आरक्षणाबाबत कोणतेही ठोस भूमिका घेतलेली नाही. मराठा आरक्षण दिल्यानंतर ते टिकावे यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी अनेक स्तरातून होत आहे त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सुद्धा याबाबत गांभीर्याने विचार करून संसदेमध्ये या मुद्द्यावर चर्चा करून काहीतरी ठोस निर्णय घेण्याची भूमिका घेण्याची गरज आहे.
त्यासाठी महाराष्ट्र मध्ये आमदारांची आणि दिल्लीमध्ये खासदारांची गरज आहे. मात्र अद्याप पर्यंत काही आमदार आणि खासदार यांनी मौन व्रत धरले आहे. अहमदनगर जिल्ह्याची परिस्थिती बघता अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार सुजय विखे पाटील आणि अहमदनगर उत्तर जिल्ह्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपली कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. अथवा खासदार सुजय विखे पाटील यांनी दक्षिण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंदोलनाला उपोषणाला कार्यकर्ते बसले आहे त्यांच्याकडे जाऊन साधा पाठिंबाही दर्शवला नाही अथवा आपली कोणतीही भूमिका जाहीर केली नाही त्यामुळे खासदार सुजय विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे यांनी का मौन बाळगले आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आमदार खासदारांनी मराठा समाजाशी येऊन चर्चा करणे गरजेचे आहे आपली भूमिका स्पष्ट गरजेचे आहे अन्यथा याचा परिणाम येत्या निवडणुकीत निश्चित मत पेटीतून दिसू शकतो.