Homeशहरनगरच्या सैनिक पत्नीचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र..आमच्या जरांगे पाटलांना वाचवा... नाही तर माझ्यासह...

नगरच्या सैनिक पत्नीचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र..आमच्या जरांगे पाटलांना वाचवा… नाही तर माझ्यासह अनेक सैनिक पत्नी आत्महत्या करतील

advertisement

अहमदनगर दि.३० ऑक्टोबर

अहमदनगर मधील सैनिक पत्नी आशा साठे यांनी मुख्यमंत्र्यांना मेलवरून पत्र पाठवले असून या पत्रात त्यांनी भावनिक अवाहान केले आहे. मराठा समजला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आजपर्यंत आरक्षणाबाबत कोणीच न्याय दिला नाही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे न्याय देतील अशी सर्वांची भावना असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सुरुवातीला सुरू केलेले तेरा दिवसांचे उपोषण मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून स्थगित केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने विश्वास ठेवला होता.मात्र आपण तिस दिवसाची मुदत दिलेली असताना त्यांनी आपल्यावर म्हणजेचं सरकारवर विश्वास ठेवून अजून दहा दिवसाची मुदत वाढवून दिली. परंतू आपले नाकर्ते सरकार अजूनही काहीचं करताना दिसत नाही. नुसत्या बैठका घेऊन ऊपयोग नाही तर आम्हा सगळ्याचं मराठ्यांना आमचा मराठा योद्धा आमचे मनोज जरांगे पाटील हवे आहेत त्यांचे ऊपोषण हे तुमच्याकडूनच सुटू शकते. आपणास विनंती आहे कि आरक्षण तर आम्ही मिळवू मात्र आमचा वाघ आम्हाला हवा आहे त्यामुळे आमचा मराठ्यांचा अंत पाहू नका. आरक्षण तर आम्हाला आमच्या हक्काचं मिळणारच परंतू आम्हाला आमच्या मनोज जरांगे पाटलांना गमवायचे नाही. जरांगे पाटलांच्या जिवीताला काही झाले तर महाराष्ट्र पेटून ऊठेल आणि त्याची सुरूवात झालेली आहे याला जबाबदार सरकार असनार आहे. असा इशाराही आशा साठे यांनी दिला आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी एकदा जरांगे पाटलांशी चर्चा करावी. कारण ते औषधोपचार ही घेत नाही आणि पाण्याचा एक थेंबही घेत नाही. बैठका नंतर घ्या मात्र आमच्या वाघाशी चर्चा करून आधी त्यांना वाचवा. सरकारने काहीचं ऊपाययोजना त्वरीत केल्या नाही तर अस समजायला हरकत नाही कि सरकारचं जरांगे पाटलांना अन्नपाण्यावाचून आत्महत्या करायला भाग पाडत आहात.. मी सैनिक पत्नी असून आम्हा सैनिक परिवाराला सवय लागलेली असते कि सैनिक कधीही देशरक्षण करताना शहिद होऊ शकतो तर मी आपणास सांगू ईच्छीते कि जरांगे पाटलांच्या जिवीतास काही बरेवाईट झाले तर माझ्यासह अनेक लोक आत्महत्या करून या मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनात शहिद होतील आणि याला जबाबदार हे फक्त सरकार असेल असे पत्र सैनिक पत्नी आशा सुधीर साठे यांनी लिहले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular