अहमदनगर दि.१ नोव्हेंबर
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता गेल्या सात दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. तसेच त्यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी उपोषण आंदोलन सुरू आहेत काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागून आमदार आणि राजकीय पुढाऱ्यांचे घरे जाळण्यात आली या घटने नंतर सरकार जागे झाले आणि मगvतातडीने सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घेतली मात्र या बैठकीतून मराठा समाजाबाबत आणि आरक्षणाबाबत काहीही निष्पन्न न झाल्याने मराठा समाज पुन्हा एकदा संतप्त झाला असून आजच्या झालेल्या बैठकीचा जीआर हा फसवा असून फक्त वैयक्तिक आमदार आणि मंत्र्यांनी आपल्याला स्वतःला सुरक्षित कसे राहतील असे ठराव करून घेतले असून या ठरावाची मराठा आरक्षणाबाबत कोणताही फायदा नसल्याने या ठरावाची होळी नगर मधील तहसील कार्यालय समोर करण्यात आली.
शासनाने असे जीआर काढण्यापेक्षा आणि बैठकी घेण्यापेक्षा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा तसेच अनेक मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे सरकारवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल का करू नये असा सवाल आता संतप्त मराठा कार्यकर्ते करू लागले आहेत त्यामुळे सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी वेळप्रसंगी कोर्टात जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. तसेच आता महाराष्ट्र सरकारने आरक्षणाबाबत लवकर तोडगा काढावा म्हणून जरांगे यांनी पाणी तयार केला आहे त्यामुळे मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा सरकारने पाहू नये अन्यथा भविष्यकाळात मोठा उद्रेक होऊ शकतो असा इशाराही सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.