अहमदनगर दि१ जून
नगर शहरातील चौपाटी कारंजा जवळ असणाऱ्या फरातखॉ मश्जिद जवळील भागात पाणी भरण्याची मोटार बंद केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या तुफाम मारामारीत एक जण गंभीर जखमी झाला आहे खालील सय्यद असे इसमाचे नाव आहे. रेश्मा सय्यद यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेची हकीकत अशी की फिर्यादी रेश्मा सय्यद आणि आरोपी वसीम फारुख शेख हे शेजारी असून खालील सय्यद यांच्या कुटुंबियांना घराबाहेत जाण्या येण्यासाठी वसीम शेख यांचे घराच्या समोरुन रस्ता आहे . त्यामुळे या ठिकाणी छोटा रस्ता असल्यामुळे आरोपींच्या घरचे धुणे भांडे रस्त्यावरच करत असल्याने घराबाहेर जाण्यायेण्याच्या कारणातून अनेक वेळा वाद झाले होते मात्र ते वाद आपसात मिटवून घेत होते.तसेच फिर्यादी यांना पाणी भरण्यासाठी मोटार नसल्याने खलील सय्यद हे वसीम फारुख शेख यांचेकडील मोटारीने पाणी भरण्यासाठी 150/रुपये प्रति महिना भाडे देत होते.
बुधवारी दि.१ जून रोजी सकाळी ७ वाजता नळाला पाणी आल्याने या घटनेतील आरोपींनी इलेक्ट्रीक मोटारीने पाणी भरले त्या नंतर साडेनऊ वाजता पाणी भरण्यावरून खालील सय्यद आणि शेख कुटुंबियांची वादावादी सुरू झाली किरकोळ वादातून पुढे शिवीगाळ आणि तुफान हाणामारीत रूपांतर झाले फारशी लाकडी दंडके आणि कोयत्याने झालेल्या मारहाणीत खालील सय्यद आणि त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. जखमी अवस्थेत शेजारीपाजारी काही लोकांनी मिळून खालील सय्यद यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते मात्र त्यांची गंभीर परिस्थिती पाहून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या नंतर जखमी खालील सय्यद यांच्या पत्नी रेश्मा सय्यद यांच्या फिर्यादीवरून वसीम फारुख शेख 2) युसुफ फारुख शेख 3) कुदुस शेख 4) रेशम वसीम शेख 5) यास्मीन युसुफ शेख 6)आशा फारुख शेख सर्व रा. फरातखाँ मस्जिद चौपाटी कारंजा, अहमदनगर 7) आक्रम शेख रा. मुकुंदनगर यांच्या विरोधात शिवीगाळ करणे ,मारहाण करणे तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने घातक शस्त्राने वार करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे