Homeराजकारणनगर शहर विधानसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रबळ दावा....

नगर शहर विधानसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रबळ दावा….

advertisement

अहमदनगर 4 ऑगस्ट

अहमदनगर शहर विधानसभेसाठी सध्या महायुती आणि महाविकास आघाडी कडून असलेल्या घटक पक्षातील पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून ही जागा आपल्याकडेच राहील असा दावा सुरू आहे. यामध्ये जर आपण पाहिले तर महायुतीमध्ये असलेले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये इच्छुक कमी आहेत तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याकडेच राहील कारण सध्या या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप मागील दोन टर्म पासून आमदार आहेत त्यामुळे भाजपा आणि शिंदे गट यांचा दावा या ठिकाणी काहीसा कमी पडू शकतो. मात्र महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी नगर शहर विधानसभेवर दावा केला आहे. मात्र काँग्रेस वगळता या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा मजबूत होऊ शकतो.


महाराष्ट्रातील राजकारणात पक्ष फुटी आधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अभेद्य असताना या ठिकाणी सरळ सरळ लढत होऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी मागील निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते गेल्या पंचवीस वर्षांपासून अहमदनगर शहरात स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्या माध्यमातून नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून अशी ओळख होती.मात्र 2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप यांनी सलग दोन वेळा अनिल राठोड यांचा पराभव करून नगर शहर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळख निर्माण केली आहे.

मात्र आता तिसऱ्या वेळेस निवडणुकीला सामोरे जाताना राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली असून त्याचबरोबर शिवसेनाही दुभंगली आहे. जे विरोधात होते ते बरोबर आले आणि जे बरोबर होते ते विरोधात गेली अशी काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रातील राजकारणात आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय होईल हे येणारा काळच ठरवेल. मात्र सध्यातरी नगर शहर विधानसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा हक्क असू शकतो अशी राजकीय परिस्थिती आहे. शिवसेनेकडून अनेक पदाधिकारी इच्छुक उमेदवार आहेत आणि नगर शहर विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती असल्यामुळे महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार या ठिकाणी निश्चित होऊ शकतो मात्र आता राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या वाटाघाटी मध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular