Homeराजकारणघड्याळ,कमळ,धनुष्यबाण,तुतारी,मशाल,पंजा, येणाऱ्या निवडणुकीत होणार याचा चिन्हावर एकामेकांविरोधत लढाई ? नगर विधानसभा...

घड्याळ,कमळ,धनुष्यबाण,तुतारी,मशाल,पंजा, येणाऱ्या निवडणुकीत होणार याचा चिन्हावर एकामेकांविरोधत लढाई ? नगर विधानसभा रिंगणात जाधव, फुलसौंदर, राठोड, डागवले, मालपाणी, वाकळे ,चव्हाण,

advertisement

अहमदनगर दिनांक २३ जुलै

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीला मिळालेली यश हे आशादायी असून त्यामुळे महाविकास आघाडी मधील सर्वच घटक पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागली आहेत. मात्र विधानसभा निवडणूक ही लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे होईल का याबद्दल अजूनही शंका आहे. कारण आता जागा वाटपावरून सुरू झालेले वाद हे शेवटी आघाडी फुटेपर्यंत आणि युती फुटेपर्यंत जातील का ? हे सांगता येत नाही मात्र आघाडी आणि युती फुटली तर प्रत्येक पक्ष हा स्वतंत्रपणे विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो हे निश्चित आहे. कारण लोकसभेत मिळालेले यश हे फक्त आपल्यामुळेच मिळाले आहे अशी भावना प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची असल्यामुळे आघाडी आणि युतीमधील सर्वच घटक पक्षातील नेत्यांनी कार्यकर्ते आता आपल्या पक्षाची ताकद दाखवण्यासाठी स्वतंत्र लढाई लढावी अशी मागणी दबक्या आवाजात सुरू केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फुटा फुटी आणि महायुतीमध्ये दुफळी निर्माण होणार आहे. त्यामुळे लोकसभेत निवडणुकीत एकत्र लढलेले महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस , आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढू शकते तर महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजपा, शिवसेना शिंदे गट ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सुद्धा वेगवेगळे लढू शकतात.

असे झाले तर अहमदनगर शहरात घड्याळ,कमळ,धनुष्यबाण,तुतारी,मशाल, या निवडणूक चिन्हावर उमेदवार उभे असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळू शकते कारण सध्या सर्वच पक्षांमध्ये अनेक जण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी चूक आहेत त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे.त्यामुळे आता थांबणे शक्य नसल्याने लढणे हा पर्याय उपलब्ध असल्याने मग सर्वच पक्षांनी आपापली ताकद का दाखवू नये असे म्हणत सर्व पक्ष स्वबाळावर लढण्याची तयारी करू शकतात.

अहमदनगर शहरातील नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे चित्र आपण पाहिले तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत कारण मागील अनेक वर्षांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस कडे असल्यामुळे आणि मागील दोन टर्म मध्ये या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहू शकते तर सध्याच्या राजकारणानुसार महायुती मधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट काय करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे तर महाविकास आघाडी मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून नगर शहराच्या जागेवर दावा प्रबळपणे केला जाऊ शकतो कारण नगर शहरात गेल्या पंचवीस वर्षांपासून एक हाती सत्ता शिवसेनेकडे होती त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे असल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नगर शहराच्या जागेवर प्रबळपणे दावा ठोकू शकते आणि तसा दावाही त्यांनी मुंबई येथे जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केला आहे. त्यामुळे सध्या तरी नगर शहरातून माजी महापौर भगवान फुलसौंदर, गिरीश जाधव आणि माजी आमदार कै .अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांची नावे चर्चेत आहेत ऐनवेळी शेंडगे यांचेही नाव पुढे येऊ शकते. तर भाजपच्या वतीने माजी महापौर बाबासाहेब वाकळे ,किशोर डागवाले यांचाही चेहरा समोर येऊ शकतो. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून निलेश मालपाणी यांचा चेहरा समोर येऊ शकतो. तर काँग्रेस कडून ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले अहमदनगर शहरातील सर्वच पक्षातील कार्यकर्ते यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले दीप चव्हाण यांचेही नाव पुढे येऊ शकते.

त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्राचे राजकारण हे आधांतरी आहे. जागा वाटपामध्ये मनासारख्या जागा मिळाल्या नाही तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बिघाडी होऊ शकते आणि सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देऊन आपापली ताकद दाखवून पुन्हा निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकतात हेही नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे यावर्षी आमदार होण्यासाठी अनेकांना संधी मिळणार आहे मात्र मतदार पुन्हा एकदा कोणाच्या गळ्यात विजयी हार घालणार हे येणारा काळच ठरवेल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular