अहिल्यानगर दिनांक 2 मे
शेवगाव येथील मीना बडाख या चार एप्रिल रोजी पुण्यावरून अहिल्यानगर कडे येत असताना त्यांच्या बरोबर असलेल्या सह प्रवाशी महिलांनी बडाख यांचे बॅग मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले त्यामुळे बडाख यांनी थेट अहिल्यानगर मधील कोतवाली पोलीस ठाणे गाठून दागिने चोरीची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत माया कल्याण भोसले हिला ताब्यात घेऊन तिने चोरी केल्याची कबुली दिली होती.मात्र चोरी केल्या नंतर चोरलेले सोन्याचे दागिने तिच्या ओळखीचा बोधेगावचा सराफ दुकानदार भागवत मधुकर आदापुरे याला दिले असल्याची कबुली दिली होती.पोलिसांनी चोरी गेलेले सोने हे सराफ दुकानदार भागवत मधुकर आदापुरे यांच्याकडून जप्त केलेले होते.मात्र पोलिसांनी या प्रकरणात फक्त चोरी करणारी महिला माया भोसले या एकट्या महिलेला आरोपी केले आहे मात्र चोरीचे सोने घेणारा तेवढाच दोषी असल्याने त्यावर सुधा गुन्हा दाखल करून चोरीच्या गुन्ह्यात आरोपी करावे अशी मागणी चोरी प्रकरणातील फिर्यादी मीना बडाख यांनी अपर पोलिस अधीक्षक वैभव कुलबरमे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.

भागवत मधुकर आदापुरे यास देखील चोरीच्या गुन्हयाचा सखोल तपास होण्याकामी गुन्हयामध्ये आरोपी करणे न्यायाचे दृष्टीने अत्यंत गरजेचे व आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसाने सदर गुन्हयात आरोपी म्हणून सराफाला त्वरीत सामिल करण्यांत यावे, अन्यथा मला व माझ्या कुटुंबीयास पोलीस अधीक्षक कार्यालया समोर अमरण उपोषणास बसावे लागेल असा इशारा फिर्यादी मीना बडाख यांनी दिला आहे.





