अहमदनगर दिनांक ३१ जुलै
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून काही दिवसांपूर्वीच विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृतपणे काँग्रेस प्रदेश कार्यालयात अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार काँग्रेसच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांनी नगर शहर व कर्जत जामखेड या दोन विधानसभेसाठी पक्ष निधी देऊन अर्ज भरला असून या जागेवर पक्ष्याकडे रीतसर दावा ठोकला आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघ ही माझी जन्मभूमी आहे तर नगर शहर मतदारसंघ ही माझी कर्मभूमी आहे तसेच या मतदारसंघात सर्वात मोठा हा ओबीसी समाज 60% असल्याने “जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी “हा काँग्रेसचा मुलमंत्र असल्याने व काँग्रेस महिलांना विधानसभेत 33% आरक्षण देणार असल्याने आपण या मतदारसंघातुन प्रदेश काँग्रेसकडे अधिकृतपणे अर्ज भरून उमेदवारी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले..या दोन विधानसभेपैकी जी जागा काँग्रेसला मिळेल त्या जागेवरून आपणास महिला आरक्षण म्हणून उमेदवारी दिल्यास आपण पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवीणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.. काँग्रेस पक्ष्याचे आपण गेल्या 17 वर्ष्यापासून प्रामाणिकणे विविध पदावर काम केले असून आजपर्यंत पक्ष्याने जी जबाबदारी दिली ती यशस्वीपणे पूर्ण पार पाडली आहे.म्हणूनच माझ्या कामाची पावती म्हणून मला सध्या काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची संधी मिळाली आहे तसेच आपण राजस्थान राज्याला सहप्रभारी म्हणून चागले काम केले व कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत गुलबर्गा विधानसभेला निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली तर तो 25 वर्ष्याचा भाजप चा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून घेऊन विजय संपादनं करण्याची किमया करून दाखवली व त्याची पावती म्हणून लगेच मध्य प्रदेश राज्याला प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीतही विरोधी पक्ष्यासोबत संघर्ष करून चार हात करत पक्ष्यासाठी योगदान देऊन जेवढा विजय संपादन केला त्यात मोलाचा वाटा राहिला व त्या यशाबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी स्वतः आपले अभिनंदन केले हीच माझी खरी यशाची पावती आहे..
आपल्या राजकीय कमी वयात आपण वरिष्ठ पातळीवर चांगला समन्वय साधून वरिष्ठ नेत्याच्या नजरेत ऍक्टिव्ह ओबीसी चेहरा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि म्हणूनच दक्षिण लोकसभेला आपल्या नावाचा वरिष्ठ पातळीवर विचार देखील करण्यात आला होता परंतु काँग्रेसला जागा न सुटल्याने ती संधी गेली आता विधानसभेसाठी संघी आहे व आपण काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर काम करत असल्याने महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागण्याचा आपल्याला पक्ष्याकडे अधिकार असल्याने सर्वप्रथम मी माझी जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या मतदारसंघातून उमेदवारी मागितली असल्याचे मंगल भुजबळ यांनी सांगितले.