Home क्राईम साहेब हे वागणं बरं नव्हं…पाव भाजी दूध विकणाऱ्याला रात्री अकरालाच बंदची तंबी...

साहेब हे वागणं बरं नव्हं…पाव भाजी दूध विकणाऱ्याला रात्री अकरालाच बंदची तंबी आणि दारू विकणाऱ्याला पहाटे चार वाजेपर्यंत हॉटेल उघडे ठेवण्याची मुभा…वा रे न्याय…

अहमदनगर दिनांक 30 जुलै

अहमदनगर शहरात सध्या अवैद्य धंदे बंद करण्याची मोहीम पोलीस प्रशासनाने जोरदार सुरू केली आहे. खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मात्र या मोहिमेदरम्यान रात्री अकरा वाजताच शहरातील ठिकठिकाणी असलेल्या छोट्या-मोठ्या चौपटीवर असणाऱ्या पावभाजी, दूध किंवा इतर खाद्यपदार्थांच्या गाड्यांना पोलीस बंद करण्यास भाग पाडतात. मात्र त्याचवेळी दारू विकणाऱ्या मोठमोठ्या परमिट रूम धारकांना पहाटेपर्यंत हॉटेल उघडे ठेवण्याची परवानगी कोणाच्या आदेशाने दिली जाते. जर न्याय द्यायचा ठरला तर सर्वांना सारखाच न्याय द्यायला हवा मात्र तो दिला जात नाही.

नगर शहरातील कॅफे आणि बिंगो, मटका, जुगार बंद झाले असले तरी लॉजिंग सर्रास सुरू आहेत हे लॉजिंग कशासाठी वापरले जातात हेही आता सर्वश्रुत आहे. त्यामुळे लॉजिंग वर छापे टाकले जात नाही मग ही कारवाई करताना दुजाभाव का केला जात आहे असा सवाल उपस्थित होतोय.

मोठमोठे हॉटेल रात्री दोन आणि तीन वाजेपर्यंत सुरू असतात तर त्यातील काही हॉटेलमध्ये सर्रासपणे हुक्का पार्लर सुरू आहेत छोट्या हुक्का पार्लरवर कारवाई होते तशी मोठमोठ्या हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या हुक्का पार्लरवर कारवाई का होत नाही? का पोलिसांवर या हॉटेलवर कारवाई करू नये म्हणून कोणाचा दबाव आहे.

पोलिसांनी कारवाई करताना कोणताही तुजाभाव न करता कारवाई करावी मोठ्यांना सोडून हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांचे गळे अवळण्याचा कोणालाही अधिकार नाही त्यामुळे पोलिसांनी आधी मोठ्या धेंडांचे हॉटेल अकरा वाजता बंद करून दाखवावे आणि मगच छोट्या-मोठ्या टपरीधारकांवर रुबाब दाखवावा..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version