Homeशहरपैसे द्या अन्यथा आमहत्या शिवाय पर्याय नाही नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खतेदारांचे...

पैसे द्या अन्यथा आमहत्या शिवाय पर्याय नाही नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खतेदारांचे मुख्यकार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

advertisement

अहमदनगर दि.५ जुलै

अहमदनगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या करंट, सेविंग, ठेव पावती मधील पैसे मिळत नसलेल्या ठेवीदारांनी नगर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालया समोर मंगळवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव आणि कर्जत येथील नगर अर्बन बँकेच्या शाखेचे ठेवीदारांनी हे उपोषण सुरू केले असून महेश जवरे, अतुल कोठारी, प्रफुल्ल कोठारी, रविकिरण नवले,स्वप्नील पितळे ,अरविंद काळोखे, आहे.अर्बन बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी यांच्यासह वीस ठेवीदारांनी हे उपोषण सुरू केले

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर सध्या रिझर्व बॅंकेने आर्थिक निर्बंध लादले असून त्यामुळे बँकेचे कामकाज ठप्प झाले आहे. सुरुवातीला आरबीआयने लादलेला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून. बँकेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन व पदाधिकारी कर्मचारी यांनी सकारात्मक कर्ज वसुली केली नसल्यामुळे आणि त्यासाठी प्रयत्नही केले नसल्यामुळे रिझर्व बँकेने पुन्हा एकदा तीन महिन्यासाठीची मुदत वाढवल्याची माहिती सभासदांना खातेदारांना मिळाली असून त्यामधील एक महिना संपून गेलेला आहे.

त्यामुळे उर्वरित दोन महिन्यात किती वसुली होईल याबाबत सभासदांना आणि खातेदारांना शंका असून या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या खातेदारांच्या लाखो रुपयांच्या रकमा खात्यामध्ये पडून आहेत.

.

अनेक खातेदारांचे कुटुंबातील सदस्य हे आजारी असून काही खातेदारांचे मुले शिक्षण घेत आहेत. लग्नकार्य आहेत मात्र पैसे मिळत नसल्याने सर्वच खातेदार सध्या हवालदिल झाले असून जे व्यापारी आहेत त्यांना दुकानांमध्ये माल घेण्यासाठी पैसा उरलेला नाही त्यामुळे त्यांच्यासमोर आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याची प्रतिक्रिया उपोषणाला बसलेल्या खातेदारांना व्यक्त केली आहे.सदर उपोषणाचा आज पहिला दिवस असून संचालक मंडळ यांनी या उपोषणाचे गंभीर दाखल घ्यावी अन्यथा पुढील आंदोलन अत्यंत तीव्र स्वरूपाचे असेल असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular