अहिल्यानगर दिनांक 29 डिसेंबर
नायलॉन मांजा वापरुन लोकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांची आता गय केलीजाणार नाही. अशा प्रकारे मांजा वापरणाऱ्या विक्री करणाऱ्या विरोधात खुनाचा प्रयत्न करणे (कलम ११०, जुने कलम ३०८) नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला. विशेष म्हणजे या प्रकाराचे गांभीर्य ओळखून
या कलमान्वये कारवाई करणारे छत्रपती संभाजीनगर पोलिस हे राज्यातील पहिले पोलिस दल आहे.
मात्र आता अशी कारवाई अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही करावी कारण जेणेकरून नायलॉन मांजा विक्री करणारे आणि विकत घेणारे या दोघांवरही जरब बसेल. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्हा पोलीस दल नायलॉन मांजा विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. मात्र अजूनही चोरीछुपे मांजाची विक्री सुरूच आहे. छत्रपती संभाजी नगर पोलिसांप्रमाणेच नगर जिल्हा पोलीस दलाने सुद्धा नायलॉन मांजा विक्री करणारे आणि विकत घेणाऱ्यांवर कलम ११०२ भारतीय न्याय संहितेनुसार कलम ११० म्हणजे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे असा कलम लावणे गरजेचे आहे.
कलम ११०२ हे भारतीय न्याय संहितेनुसार कलम
११० म्हणजे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे अशी व्याख्या आहे. यात गुन्हा सिद्ध झाल्यास तीन
वर्षांची शिक्षा आणि दंडांची तरतूद आहे. जुन्या दंड सहितेप्रमाणे हे कलम ३०८ होते.