अहमदनगर दिनांक आठ मार्च
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अहमदनगर शहराजवळ असलेल्या अकोळनेर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांच्या तफ्यासमोर मराठा आंदोलक युवकांनी काळे झेंडे फडकवले. एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी युवकांनी काळे झेंडे फडकवत नारायण राणे यांचा निषेध केला.
भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल केलेल्या टिके मुळे मराठा समाज संतप्त झालेला आहे. त्यामुळे नारायण राणे येणार असल्यामुळे सकाळपासूनच त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी मराठा आंदोलकांनी तयारी केली होती.मात्र पोलिसांनी नारायण राणे यांच्या हेलिकॉप्टर उतरण्याआधीच काही युवकांना ताब्यात घेतले होते. मात्र काही युवकांनी नगर पुणे रोडवरील शिल्पा गार्डन समोर नारायण राणे यांचा ताफा अकोलनेर येथे जात असताना त्यांच्या तफ्यासामोर काळे झेंडे फडकून निषेध केला. पोलिसांनी सकाळपासूनच काळे झेंडे दाखवण्यापासून अनेक तरुणांना प्रवृत्त केले होते तर काहींना ताब्यातही घेतले होते मात्र तरीही गनिमी काव्याने अखेर मराठा तरुणांनी नारायण राणे यांना काळे झेंडे दाखवले.