अहमदनगर दि.९ मार्च
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ सरळ लढत झाली होती. त्या वेळी सुजय विखे पाटील यांना 704660 तर संग्राम जगताप यांना 423186 मते मिळाली होती. मोठ्या मताधिक्याने सुजय विखे पाटील विजयी झाले होते. ऐन वेळेस काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश करूनही मोदी लाटेमध्ये डॉ .सुजय विखे पाटील यांचा विजय झाला होता.
गेल्या पाच वर्षात खा.सुजय विखे पाटील यांनी कामाचा झंजावात सुरू ठेवला आहे. अहमदनगर शहरातील अनेक वर्षांचा प्रश्न असलेल्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी त्यांनी मोठा प्रयत्न केला ज्याप्रमाणे स्वर्गीय दिलीप गांधी यांनी या प्रश्नाला गती देण्यासाठी प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे खासदार सुजय विखे पाटील यांनी ते काम पूर्णत्वास नेले. अहमदनगर शहरातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी खासदार सुजय विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिला आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मोठा विकास निधी खासदार सुजय विखे पाटील यांच्या खासदार निधी मार्फत वाटप करण्यात आला आहे.
मात्र निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली तसे विरोधकांकडून नव्हे तर भाजपकडून अंतर्गतच खासदार सुजय विखे पाटील यांना विरोध होऊ लागला होता. विशेष म्हणजे भाजपचे आमदारच लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे वारंवार सांगत असताना अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात मोट बांधण्यासाठी एकत्र आले होते. मात्र विकासाच्या जोरावर खासदार सुजय विखे पाटील यांनी आपली घौड दौड सुरूच ठेवली गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे पाटील यांचे नाव लोकसभेच्या उमेदवारांच्या नामवालीतून गायब झाले असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक तर्क वितर्क लोकसभेच्या उमेदवाराबाबत सुरू असताना खासदार सुजय विखे पाटील हेच पुन्हा लोकसभेचे दक्षिण मतदार संघाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मध्यंतरी गुपचूप सुरू असलेल्या भाजपच्या अंतर्गत चर्चांवर आता पडदा पडण्याची शक्यता असून अनेकांनी खा. सुजय विखे पाटील यांच्या बाबतचे सर्वे निगेटिव्ह गेले वरिष्ठ भाजप नेते विखेंवर नाराज भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी खासदारांवर नाराज अगे देखो होता है क्या अशी चर्चा सुरू असतानाच डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
केल्या काही महिन्यांपासून सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात अनेक कार्यक्रमांची मेजवानी मतदारांना दिली आहे. सांस्कृतिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान महिला दिनाच्या निमित्ताने होणारे विविध कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची मतदारांपर्यंत जाण्याची पहिली फेरी पूर्ण केली आहे.
सध्या अहमदनगर दक्षिण मधून भाजपच्या विरुद्ध महाविकास आघाडी कडून कोण उमेदवार उभा राहणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महाविकास आघाडी नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्याकडे डोळे लावून बसले आहेत.मध्यंतरी झालेल्या छत्रपती संभाजी महाराज महानाट्य आडून बरेच काही नाट्य झाले मात्र हे महानाट्य फक्त त्या महानाट्य पुरतेच होते असेच म्हणावे लागेल कारण राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून पारनेर मतदारसंघासाठी अजित पवार यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा विकास निधी आलेला आहे त्यामुळे निलेश लंके खरंच महायुती सोडून महाविकास आघाडी कडे येणार का ? असाही प्रश्न यामुळे समोर येतोय तर निलेश लंके नाही तर कोण याबाबत कोणताही चेहरा सध्या तरी महाविकास आघाडीकडे नसल्यामुळे खा.सुजय विखे पाटील यांच्यासमोर निवडणुकीला कोण उभे राहणार याच्याच विवंचनेत महाविकास आघाडी आहे तर या सर्व गोषटींचा विचार न करता खासदार सुजय विखे पाटील यांची मतदारसंघात घौड दौड सुरू असून त्यांनी आपल्या प्रचार फेरीचा पहिला टप्पा पूर्णही केला आहे.
त्यामुळे जर तर आणि खा.सुजय विखे पाटील यांना तिकीट भेटणारच नाही असे भाकीत करणाऱ्यांना आता खासदार सुजय विखे पाटील यांचा प्रचार करावा लागणार हे मात्र निश्चित आहे. तर महाविकास आघाडी कडून कोण याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेचे गुऱ्हाळच रंगणार आहे.
कुणी कितीही करा कल्ला नाही हटणार विखेंचा किल्ला… असंच काहीसं अहमदनगर दक्षिण जिल्ह्याच्या सध्याच्या राजकारणावरून म्हणावे लागेल.