अहमदनगर
मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात नगर जिल्ह्यातील चालकांनी सहभाग नोंदविला असून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने मार्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान टँकर चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरामध्ये सकाळपासून पंपांवर इंधन भरण्यासाठी गर्दी दिसून आली.
मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे पेट्रोल आणि डिझेल टँकर येणार नाही अशी चर्चा सुरू झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासू शकतो या अफवे मुळे अनेक नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे. रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावर शेकडो नागरिक रांगा लावून पेट्रोल भरण्यासाठी उभे राहिल्याचे चित्र नगर मधील विविध पेट्रोल पंपावर दिसून आले.