अहमदनगर दि २१ जून
झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतून वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिव लतिका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा येथील एनपी स्कूल मध्ये तसेच टाकळीभान येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा
रुपाली ताई चाकणकर यांच्या आदेशानुसार वटपौर्णिमे निमित्त ” झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतून जगजागृती करून निर्सगाचा समतोल राखण्या साठी हे आयोजन करण्यात आले होते.
ऑक्सीजन युक्त हवा देणारे वृक्ष वड, पिंपळ, रामफळ, लक्ष्मण फल, बेहडा, हिरडा, कडूनिंब इत्यादी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच जि.प. प्राथमिक शाळा जलशुद्धी करण केंद्र-देहेरे येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच महिलांना वृक्षसंवर्धन महत्व पटवून वृक्ष संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात आली.
मागील काही काळांपासून तापमानाने उच्चांक गाठला असून 40 ते 45 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्यामुळे याचा परिणाम जन जीवनावर होत आहे झाडांची कत्तल आणि त्याचे दुष्परिणाम यामुळे तापमान वाढीचा फटका निसर्गाला बसत आहे त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमास स्कूल प्राचार्य कोकीला शेळके, निसर्ग पर्यावरण अध्यक्ष प्रमोददादा मोरे छायाताई राजपूत, कवी पोपट पटारे,अध्यक्ष रोहिदास पटारे,मुख्याध्यापक अनिल कडू ,केंद्र प्रमुख शिंदे सर, डॉ. दुधाट सर, सभापती वंदना मुरकुटे, अर्जुनराव राऊत, लोंखंडे, सर, भैया पठाण ओमकार स्वामी जंगम, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय बोरुडे, अध्यक्ष- कोंडानी होडगर, सरपंच संजय बाचकर शिक्षिका – अर्चना बोरुडे, रेणुका खेडकर, सुनीता अडसुरे, शोभा भालसिंग, हिरा शहापुरे, संगीता बारसे आदी मान्यवर उपस्थित होते.