HomeUncategorizedनगर शहर विधानसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांना उमेदवारी...

नगर शहर विधानसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांना उमेदवारी मिळावी यासाठी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी लवकरच शिष्टमंडळ मुंबईला जाणार

advertisement

अहमदनगर दिनांक २० जून
लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसला. जय-पराजयाचे कवित्व संपले आणि आता नेते-
कार्यकर्ते यांना विधानसभेचे वेध लागले. कोण कोणत्या पक्षातून उमेदवार असू शकतो, कोणाला डावलले जाऊ शकते, कोणाच्या नाराजीचा कसा
फायदा घेतला जाऊ शकतो, याचे आडाखे बांधून अनेकजण आत्तापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

नगर शहरात आमदार संग्राम जगताप पुन्हा उमेदवार असतील. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत महायुती मधील घटक पक्ष असलेल्या भाजपा मधून काही जण इच्छुक आहेत त्यामुळे महायुतीत उमेदवारीसाठी जोरदार चुरस पहायला मिळत आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात २५ वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला धक्का देऊन २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आमदार झाले सर्व विरोधकांनी एकत्र संग्राम जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले होते.

तर महाविकास आघाडी कडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस यांच्याकडून अनेक जण उमेदवारासाठी इच्छुक आहेत. अहमदनगर शहरात विधानसभेची ही जागा मूळची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटाघाटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली गेली असल्यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्हीही गट या जागेवर आपला हक्क सांगणार आहेत त्याचप्रमाणे भाजप शिवसेना युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे होती आता शिवसेना आणि भाजप वेगळे असल्यामुळे ही जागा दोन्हीही पक्ष मागू शकतात. त्यामुळे आता या जागेवर कोणाला उमेदवारी भेटते हे पुढील काळात कळेलच मात्र सध्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून महत्त्वाची भूमिका बजावलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे समर्थक आग्रही असून लवकरच मुंबई येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन गिरीश जाधव यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अहमदनगरचे शिष्टमंडळ जाऊन करणार आहे. याबाबत मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेटीची वेळ मिळाल्यानंतर गिरीश जाधव यांच्या उमेदवारासाठी अहमदनगर मधून हजारो समर्थक मुंबईमध्ये जाणार आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular