Home राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची भाऊ गर्दी सतरा प्रभागासाठी दोनशे पेक्षा जास्त अर्ज…तर...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची भाऊ गर्दी सतरा प्रभागासाठी दोनशे पेक्षा जास्त अर्ज…तर प्रभाग चार मधून इतके अर्ज…

Oplus_0

अहिल्यानगर दिनांक 2 नोहेंबर

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज मागवण्यात आले होते. मंगळवारी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणुकीसाठी एक बैठक प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत सर्व जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांची बैठक घेण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज आज मागवण्यात आले होते.

Oplus_131072

17 प्रभागात जवळपास दोनशे पेक्षा जास्त अर्ज आज इच्छुक उमेदवारांनी दखल केले आहेत अशी माहिती शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली.आजचा सर्व जो डेटा आहे तो सर्व राज्यस्तरीय बैठकीत सादर केला जाणार आहे.त्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे.

नव्याने तयार झालेला प्रभाग क्रमांक चार हा मुस्लिम बहुल प्रभाग असून मुकुंद नगर, फकीरवाडा, गोविंदपुरा, दर्गा दायरा असा भाग प्रभाग क्रमांक चार मध्ये येत असून. या ठिकाणी सर्व मुस्लिम बहुलभाग असल्याने आणि सध्या आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका यामुळे प्रभाग क्रमांक चार मधून कोण इच्छुक उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या प्रभागातून अर्ज आले असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप आणि संपत बारस्कर यांनी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version