अहमदनगर दि.३ जून
९ जुन राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या वर्धापन दिना निमीत्त अहमदनगर मध्ये होणा-या मेळाव्या साठी मैदानाची निवड करण्यात आली असून नगरच्या रेल्वे ब्रीज शेजारील केडगांव येथील मैदान फायनल करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब साहेबांच्या कडून मैदानाची पाहणी करण्यात आली असून चार तारखेला जयंत पाटील यांच्या हस्ते स्टेज उभारणीचा शुभारंभ होणार आहे.
तर राष्ट्रवादीकडून सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.या सभे दरम्यान लोकसभेचे निवडणुकीचे रणशिंग राष्ट्रवादी फुंकण्याची शक्यता आहे तसेच संघटनात्मक बदलही या सभेदरम्यान होऊ शकतात अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे संपूर्ण देशातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या सभेला राहणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.