HomeUncategorizedलोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी पाच नावांची चर्चा...

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी पाच नावांची चर्चा सुरू

advertisement

अहमदनगर दि.३० मे
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने आता सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजीतदादा पवार, आ छगन भुजबळ, खा सुनील तटकरे , खा श्रीनिवास पाटील, आ हसन मुश्रीफ आणि राज्यातील इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

बैठकीत अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे निरीक्षक माजी महापौर अंकुश काकडे, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र फाळके माजी मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, घनश्याम शेलार ,अंबादास गरुडकर, राजेंद्र कोठारी आदी अजी माजी आमदार व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.

या बैठकीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यात आली तसेच मतदारसंघाचा उमेदवार लवकरात लवकर ठरवावा अशी मागणी सर्व नेत्यांनी यावेळी खासदार शरद पवार यांच्याकडे केली. या मध्ये पारनेर नगर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके जिल्हाअध्यक्ष राजेंद्र फाळके तसेच विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांच्या नावावर चर्चा झाली. मात्र अद्यापही एकमताने एकाही नावावर शिक्कामोर्तब झाले नसून मतदारसंघाचा आवाका मोठा असल्याने उमेदवाराला शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे लवकरात लवकर उमेदवार ठरवून त्या नावावर शिक्का मोर्तब करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर या बैठकीला कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार हे चोंडी येथील कार्यक्रमामुळे अनुपस्थित होते तर नगर पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे आता अहमदनगर दक्षिण जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता लागून राहिलेली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular