अहमदनगर दि.४ जानेवारी
अहमदनगर मधील उध्दव बाळासाहेब ठाकरे युवसेनेला खिंडार पडले असून युवासेनेचे जिल्हा प्रमुख आकाश कतोरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर अहमदनगर दक्षिण जिल्हा युवासेनेची जबाबदारी सोपविण्यात आली असून योगेश गलांडे यांनीही उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
मुंबईत मध्ये खा. श्रीकांत शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या उपस्थितीत दोन्ही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. या वेळी अहमदनगर जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, सचिन जाधव आदी अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.