अहमदनगर दि.८ ऑगस्ट
कर्जत येथील प्रतीक पवार या तरुणाने नुपूर शर्मा हिच्या समर्थानात सोशल मीडियावर मेसेज टाकले होते या कारणातून त्यास तीन दिवसापूर्वी कर्जत येथे काही तरुणांनी मारहाण केली होती. याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटले असून भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर मध्ये प्रतीक पवार यांची खाजगी रुग्णालयात भेट घेतली.
त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा करून या प्रकरणात सखोल तपास करून एकही आरोपीला सोडू नका अशी मागणी केली. तसेच या प्रकरणात कर्जत तालुक्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे पक्षपात करत असल्याचा आरोप यावेळी नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांनी केला असून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बदली करावी अशी मागणी यावेळी आमदार राणे आणि आमदार पडळकर यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.