Homeविशेषदर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर दिवाळी अंक स्पर्धेत निशांत दिवाळी अंकास द्वितीय क्रमांकाचे...

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर दिवाळी अंक स्पर्धेत निशांत दिवाळी अंकास द्वितीय क्रमांकाचे मानांकन जाहीर यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात दि.25 रोजी पुरस्कार वितरण

advertisement

अहमदनगर दि.२१ नोव्हेंबर –

यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर केला. यामध्ये नगरमधून गेल्या 22 वर्षांपासून प्रसिद्धी होणार्या निशांत दिवाळी अंकास यंदाचा दुसर्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती प्राचार्य शांताराम आवटे, प्रमुख कार्यवाह ताराचंद आवळे व अमर शेंडे यांनी दिली.
या पुरस्काराचे वितरण फलटण येथे शुक्रवार दि. 25 नोव्हेंबर 2022 रोजी होणार्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण विधान परिषदेचे सभापती ना.रामराजे निंबाळकर, डॉ.विश्वजित कदम खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ.दिपक चव्हाण, आ.उल्हास पवार, पद्मश्री लक्ष्मण माने, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदि मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.


निशांत दिवाळी अंकास यापुर्वी मराठी वृत्तपत्र लेखक संघ, नंदा फौंडेशन, शब्दगंध साहित्य परिषद, इंदिरा प्रतिष्ठान, मराठी साहित्य संमेलनाच्या संगमनेर शाखा आदि विविध संस्थांनी पुरस्काराने गौरविले आहे.
राज्यस्तरीय पुरस्कार निशांत दिवाळी अंकास जाहीर झाल्याबद्दल संपादक निशांत दातीर यांचे अनेकांनी अभिनंद केले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular