Home राज्य ग्राहकाने दिली बैंगन मसाल्याची ऑर्डर शुद्ध शाकाहारी जेवणात आले मटणाचे तुकडे या...

ग्राहकाने दिली बैंगन मसाल्याची ऑर्डर शुद्ध शाकाहारी जेवणात आले मटणाचे तुकडे या नामांकित हॉटेलची बनवेगिरी उघड….व्हिडिओ व्हायरल..

अहमदनगर दिनांक २२ सप्टेंबर
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून गणपती उत्सवामध्ये काही मित्र एका नामांकित हॉटेलमध्ये जेवायला गेले. गणपती उत्सव असल्यामुळे मांसाहारी खाणे टाळून शुद्ध शाकाहारी जेवणाची ऑर्डर या मित्रमंडळींनी वेटरला दिली वेटरने जेवण आणून सर्व उपस्थित असलेल्या टेबल वरील लोकांना जेवण ताटात वाढले.आणि जेवण सुरू होताच बैंगन मसाला या भाजीमध्ये चक्क मांसाचे (मटण) तुकडे आढळून आल्यामुळे ग्राहक चांगलेच संतापले.

गणपती उत्सव असल्यामुळे शाकाहारी जेवण जेवायला गेलेल्या या मित्रमंडळींना चांगलाच मनस्ताप झाला. याबाबत त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला जाब विचारला हॉटेल व्यवस्थापनाने याबाबत चुकी मान्य करून माफीही मागितली. मात्र जर अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक होत असेल तर शाकाहारी आणि मांसाहारी याबाबत हॉटेलमध्ये बोर्ड का लावले जातात असाही प्रश्न समोर येतो. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे ते हॉटेल चांगले नामांकित आहे. या हॉटेलच्या शाखा नगरसह पुणे,मुंबई मध्ये असल्याच बोललं जातं. मात्र ग्राहकांची अशी शुद्ध फसवणूक करणे म्हणजे हे एक पापच असून गणपती उत्सवामध्ये शाकाहारी खाण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना चक्क मांसाहारी खाण्याची वेळ या हॉटेल व्यवस्थापनामुळे आल्यामुळे ग्राहक चांगलेच संतापले होते. जर या उलट ग्राहकाकडून काही चुकी झाली असती तर हॉटेलने या ग्राहकांना सोडले असते का? असा सवालही या व्हायरल व्हिडिओमध्ये ग्राहक हॉटेल व्यवस्थापाकाला विचारतो आहे.

या आधीही या हॉटेलच्या शृंखले मध्ये एका ग्राहकाला पैसे देण्यावरून चांगलीच मारहाण झाल्याची घटना नगर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती आता शाकाहारी जेवणाच्या नावाखाली मांसाचे तुकडे देऊन या हॉटेलने आपला खरा रंग रूप दाखवून दिला आहे.

मांसाहारी खण्या बरोबर शाकाहारी जेवणालाही चांगली चव यावी यासाठी मांसाहारी पदार्थाचे मिश्रण (रस्सा) शाकाहारी भाजीमध्ये दिला जातो हेच या व्हायरल व्हिडिओवरून समोर येत असल्याचे दिसतेय .त्यामुळे शाकाहारी खाणाऱ्यांनो जरा जपूनच तुम्ही खाताना मांसाहारी पदार्थांचे सेवन तर करत नाही ना याकडे लक्ष ठेवा.
पहा व्हायरल व्हिडिओ 👇

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version