Home शहर तुमच्या घरात एखादा आजी माजी खासदार,आमदार अथवा नगरसेवक असेल तरच तुमच्या घराच्या...

तुमच्या घरात एखादा आजी माजी खासदार,आमदार अथवा नगरसेवक असेल तरच तुमच्या घराच्या आसपास काम होतील मनसे नेते संदीप भांबरकर यांची ती बोलकी पोस्ट

अहमदनगर दि२९ सप्टेंबर

अहमदनगर शहरात सध्या खड्ड्यांचा साम्राज्य पसरले आहे. अहमदनगर शहरात चालू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम त्यानंतर गॅस पाईपलाईन आणि विविध नेट कंपनीच्या वायरी जमिनीखालून अंथरण्याचे काम सुरू असल्यामुळे ठीक ठिकाणी खड्डेच खड्डे झाले आहेत. आणि यावर्षी वरूणराजाने अहमदनगर शहरावर चांगलीच कृपादृष्टी केल्याने शहरात आणखीनच जास्त खड्डे पडले आहेत. फेज टू ची लाईन झाल्यानंतर त्यानंतर लगेच त्या ठिकाणी खड्डे बुजवणे अपेक्षित आहे मात्र हे खड्डे बुजवले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. शहरातील खड्डे हे फेज टू च्या कामामुळे झाले असल्याची कबुली ही आयुक्तांनी दिली होती. मात्र नगर शहरात काही ठिकाणी व्हीआयपी ट्रीटमेंट ठेकेदाराकडून दिली जाते सामान्य नागरिकांच्या घरासमोरचे खड्डे लगेच बुजवले जात नाहीत. मात्र काही ठिकाणी सकाळी फेजटू चे काम झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत थांबून लगेच सिमेंट काँक्रीटमेंट केले जाते.असाच काहीसा प्रकार नगर शहरातील चितळेरोड भागात घडला आहे.याबाबत मनसे नेते संदीप भांबकर यांनी सोशल मीडियावर एक खरमरीत पोस्ट टाकली असून तुमच्या घरात एखादा आजी माजी खासदार,आमदार अथवा नगरसेवक असेल तरच तुमच्या घराच्या आसपास काम होतील वाचा काय आहे वसुस्थिजन्य पोस्ट

 

(आता नगर शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरांमध्ये आजी-माजी नगरसेवक किंवा आमदार करायला हवे का)
😡😡😡😡😡😡
वाचा व निर्णय घ्या
👇👇👇👇👇
“पहा नगरकर आपण खड्ड्यात पण राजकीय लोक राहतात तिथे मनपा अधिकारी ,महापौर व ठेकेदार यांच्या कडून vip सुविधा ” का तर तें आजी माझी लोकप्रतिनिधी आहे.
अहमदनगर शहरांत मनपा भुयारी गटार योजना या मार्फत सध्या काम सुरू असल्या कारणाने नगर शहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. असे मनपा आयुक्त,बांधकाम विभागांमधील अभियंता असो किंवा कर्मचारी असो त्यांच्यामार्फत सांगण्यात येते. परंतु मा स्वर्गवासी अनिल भैय्या राठोड जिथे राहतात त्यां भागांत काही दिवसापूर्वी भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाले.जसे नगर शहरांतील इतर भागांत 🧐
मग मला मनपा आयुक्त,शहर अभियंता व ठेकेदार यांना एक विचारणा आहे. ती नगर शहरातील नागरिक हे माणसं नाही का.नगर मधील नागरिकांच्या घरासमोरील जे भुयारी गटार योजनेचे काम झाले. त्या अंतर्गत जें खड्डे पडलें आहे तें ठेकेदाराने आहे तसेच ठेवले आहे. परंतु राजकीय लोकप्रतिनिधी जिथे राहतात तिथे भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण करून झाले कीं लगेच पूर्ण रोड व्यवस्थित करून दिला 😡 ह्यां विषयी मी त्यां ठेकेदारच्या माणसाला विचारणा केली कीं भावा हे भुयारी गटार योजना अंतर्गत झालेले काम आहे ना मग तू इथला रोड व्यवस्थित करून देतो ना मग शहरातील इतर भागाचे रोड का असें व्यवस्थित तयार करून देत नाहीतर तो अतिशहाणा मला बोलतो तुला काय वाकडं करायचे ते कर मला महापौर आणि शहर अभियंता व इतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की भैय्याच्या घराकडे जाणारा रोड दोन दिवसात व्यवस्थित व्हायला हवा. इथपर्यंत ठीक आहे हा शहाणा माझा फोटो काढतो आणि मला म्हणतो तुला दाखवतो पहा मी कोणाचा माणूस आहे. अरे गाढवा आता मी तुला दाखवतो मी कोण आहे. तुझे बिल कसे निघते तें पाहतो 😡
आता नगर शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरात एक एक माजी नगरसेवक व माजी आमदार निर्माण करायला हवा का मग त्यानुसार आमच्या घराबाहेरील खड्डे तुम्ही यांना जशी व्हीआयपी सुविधा दिली त्या पद्धतीने बुजवणार😡😡
आपला संदीप भांबरकर

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version