अहमदनगर दि.२९ सप्टेंबर
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात एका मुलाला नवरात्र उत्सवाच्या मंडपा समोरील उघड्या वयारच शॉक लागून अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे नवरात्र उत्सवाचा मंडप मोठ्या डीपी शेजारी लावण्यात आला होता. आणि डीपी संपूर्णपणे उघडी असून वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला की अन्य काही कारणामुळे हा मृत्यू झाला याबाबत या ठिकाणी परिसरातील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे गुलमोहर रोड परिसरामध्ये चक्क झाडाच्या बुंध्यांवर मीटर लावून हातगाडीवाल्यांना मीटर दिल्याच्या प्रकार झाले आहेत.
रोहित जगधने असे बारा वर्षीय मुलाचे नाव असून त्याला फिट आल्याचे काही जण सांगत आहेत तर काही जण विजेचा शॉक बसल्याचे सांगत आहेत. जगधने याला जिल्हा रुग्णालय ठेवण्यात आले असून सकाळी पोस्टमार्टम झाल्यानंतरच रोहित जगधने याचा मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकेल.