HomeUncategorizedऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट स्कुल मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ३१ ऑगस्ट पासून संपावर

ऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट स्कुल मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ३१ ऑगस्ट पासून संपावर

advertisement

अहमदनगर दि.२८ ऑगस्ट

शहरातील सावेडी भागात असणारी ऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट स्कूल मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपाचे हत्यार उपसले असून गेल्या अनेक वर्षापासून येथील कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे पगार देण्यात येत नाही, या शिवाय कर्मचाऱ्यांचे नौकरी संबंधीत महत्वाचे दस्तावेज देण्यात आलेले नाही, सर्व्हिस बुक, पे स्लीप, अपॉईटमेन्ट ऑर्डर, कर्मचाऱ्यांची शासनाकडून घेतलेली मान्यता बाबत शाळा प्रशासन शिक्षकांना देत असल्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.


या शाळेत कर्मचाऱ्यांकडून शासकीय शाळेपेक्षा जास्त काम करुन घेतले जाते मात्र पगार शायकीय नियमाप्रमाणे देण्यात येत नाही. कामाचा तासांचे काही नियोजन नाही, शाळा सुटल्यावर अनेक तास थांबुन कर्मचाऱ्यांना काम करण्यास भाग पाडले जाते. पगाराबाबत अनेक त्रुटी आहेत. पगार वेळेवर जमा न होणे, वरीष्ठ श्रेणी डावलणे, इंक्रिमेट न देणे, महागई भत्त्यात नियमाप्रमाणे वाढ न करणे. विद्यार्थ्यांच्या मॅटरनिटी संबंधीत तक्रारी अशा अनेक तक्रारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या असून हे कर्मचारी त्यांचे सर्व जीवन शाळेसाठी व मुलाच्या भविष्यासाठी देत असतात मात्र शाळेकडून त्यांचावर अन्याय होत आहे अशी ही तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून वारंवार शाळेच्या व्यवस्थापणाला विनंती करण्यात आली होती. मात्र शाळा प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे अखेर 31 ऑगस्ट पासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संप करणार आहेत अशी माहिती ऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट स्कुल मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

ऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट स्कुल मधील शिक्षक अर्चना साळवे, माया मकासरे, गुरुशिल सोही,यांच्या सह सुहास करंडे, भाऊसाहेब काळदाते, अंजली भिंगारदिवे,गॅसपर बनसोडे, गोविंद कांडेकर विजय पठारे, निर्मला पारखे, जोनिता गायकवाड, क्रांती पघडमल, रामप्यारी जाट ,यामिनी आपटे, जया भाटिया, पौर्णिमा सोनवणे, शिल्पा शिंदे, श्याम लोंढे, स्नेहल खांत, कांचन धीवर, विशाखा फिलिप, सगुना ताकवले,शांती नेरो, रचना गायकवाड, मयूर टेमक अर्चना लोखंडे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या संपामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही यासाठी शाळा प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावे व शाळा प्रशासनाने आडमुठे धोरण ठेवले तर विद्यार्थ्यांच्या नुकसानाला शाळा जबाबदार राहील अशी भूमिका ही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.

शिक्षकांनी संप केला तर ऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट स्कुल 31 ऑगस्ट पासून शाळेत शिकवणार नाहीत.त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि शाळा प्रशासनाने जर यावर तोडगा काढला तर संप मागे घेतला जाईल अशी भूमिकाही शिक्षकांनी मांडली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular