Home Uncategorized बुधवारी देशात मॉक ड्रिल; सगळीकडे सायरन वाजणार, नागरिकांना स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग देण्याचे केंद्राचे...

बुधवारी देशात मॉक ड्रिल; सगळीकडे सायरन वाजणार, नागरिकांना स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग देण्याचे केंद्राचे आदेश

Oplus_131072

दिल्ली दिनांक 5 एप्रिल

: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध ताणले गेलेले आहेत. पाकिस्तान हा देश दहशतवादाला खतपाणी घालतो, अशी भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रसंघात मांडलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती येत आहे. येत्या ७ तारखेला, बुधवारी संपूर्ण देशात मॉक ड्रिल घेतला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश दिलेले आहेत. संपूर्ण देशामध्ये याच दिवशी सायरन वाजला जाणार आहे. हवाई हल्ल्याचा अलर्ट देणारा सायरन असेल, असा त्याचा अर्थ आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version