Home राजकारण अखेर विठ्ठलाच्या पूजेला जाणार एकनाथ,आषाढी एकादशी निमित्त होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच...

अखेर विठ्ठलाच्या पूजेला जाणार एकनाथ,आषाढी एकादशी निमित्त होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते पूजा

मुंबई – आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेला कोण जाणार म्हणून काही दिवसांपासून सस्पेन्स होता. दहा ते पंधरा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे राजकारणात अनेक भूकंप झाले रात्रीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले होते त्यामुळे या आषाढीला विठ्ठलाच्या पूजेचा मान कोणाला भेटणार याबाबत संभ्रम होता सोशल मीडियावर याबाबत अनेक प्रतिक्रिया ही उमटल्या होत्या उद्धव ठाकरेच आषाढीला पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलाची पूजा करतील असेही काही जाणकारांचे मत होते.

मात्र आता या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची पूजा होणार आहे.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या दिनी महापूजेसाठी सहकुटुंब येण्यासाठी त्यांना आमंत्रित केले आहे.पंधरा फेटा आणि विना देऊन मंदिर समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निमंत्रण दिले आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version